1. मुखपृष्ठ
  2. माहिती
  3. धार्मिक स्थळे...
  4. भैरवनाथ देवस्थान

भैरवनाथ देवस्थान

श्री भैरवनाथ-जोगेश्वरी माता

वैभवशाली देलवडी ग्रामात श्रीखंडोबा देवस्थान आहे. त्याचबरोबर श्री. काळभैरवनाथ-जोगेश्वरी मातेचे देवस्थानही आहे. श्री. काळभैरवनाथाचे देवस्थान देलवडी गावात जवळजवळ पंचवीस वर्षांपासून अस्तित्वात आहे. या देवस्थाना बद्दल माहिती देताना देवस्थानचे पुजारी व भक्त श्री. बाळासाहेब विष्‍णू शेलार सांगतात की त्यांचे आजोबा भगवंत शेलार भैरवनाथाचे भक्त होते. त्यानंतर त्यांचे वडील विष्णू शेलार हे सासवड येथील भैरवाडी येथे भैरवनाथाच्या सेवेत जात होते. कालांतराने त्यांच्या बरोबर देव देलवडी या ठिकाणी आला व आता श्री. बाळासाहेब शेलार भैरवनाथ-जोगेश्वरी मातेची पूजा करतात. त्याचबरोबर देलवडीतील संपूर्ण शेलार परिवार या देवस्थानाची भक्ती करतो. भैरवनाथ जोगेश्वरी मातेचा उत्सव दरवर्षी दत्तजयंती नंतर येणाऱ्या पहिल्या चतुर्थीला साजरा केला जातो. या वेळी देवाचा अभिषेक करून व वस्त्रालंकृत करून देवाची आरती केली जाते. दिवसभर नवस फेडले जातात व लोककलावंत आपली कला सादर करतात. संध्याकाळी जंगी कुस्तीचे मैदान भरते व त्यानंतर संध्याकाळी देवाचा छबिना निघतो. त्या वेळी सुंदर आकर्षक व अलंकृत डोळ्याचे पारणे फेडणारे घोडे मिरवणुकीत सामील होतात. सर्व देलवडी नगरी गुलालात न्हाऊन निघते. शेवटी लोकनाट्याने यात्रेची सांगता होते. या देवस्थानासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून व परराज्यातूनही अनेक भाविक मंडळी दर्शनास येतात. नवसाला पावणारा देव म्हणून देलवडीचा श्री. भैरवनाथ प्रसिद्ध आहे.

WhatsApp Image 2022-05-26 at 8.25.25 PM (1)
WhatsApp Image 2022-05-26 at 8.25.25 PM
WhatsApp Image 2022-05-26 at 8.25.24 PM (1)
WhatsApp Image 2022-05-26 at 8.25.24 PM
WhatsApp Image 2022-05-26 at 8.25.15 PM (1)
WhatsApp Image 2022-05-26 at 8.25.15 PM
WhatsApp Image 2022-05-26 at 8.25.14 PM (1)
WhatsApp Image 2022-05-26 at 8.25.14 PM
WhatsApp Image 2022-05-26 at 8.25.13 PM
WhatsApp Image 2022-05-26 at 8.25.05 PM (1)
WhatsApp Image 2022-05-26 at 8.25.05 PM
WhatsApp Image 2022-05-26 at 8.25.04 PM
WhatsApp Image 2022-05-26 at 8.24.54 PM
previous arrow
next arrow
बंद